न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील सावळवाडा शाळेतील छोट्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेली वारकरी दिंडी गावात लक्षवेधी ठरली . मुख्याध्यापिका सीमा मोरजकर यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला होता .
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम सावळ, ग्रामपंचायत सदस्या निकिता बुगडे,माजी अध्यक्ष पांडुरंग बुगडे, विष्णु सावळ, सुंदर हरमलकर, तसेच माता पालक संजना गंवडे, मानवी हरमलकर, समीक्षा सावंत विनिता बुगडे,वेदिका भगत, प्रणिता गंवडे, सुजाता हरमलकर, शुभांगी सावळ, समिक्षा हरमलकर, आरती सावळ, पूर्वा हरमलकर, रिया हरमलकर, गौरी सावळ, सहकारी शिक्षिका पूजा पवार, अमृता बांदेकर, शिक्षक सागर खटावकर, आदी उपस्थित होते .









