वार्ताहर/किणये
मारुती गल्ली मच्छे येथील दुर्गामाता उत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 22 रोजी घटस्थापनेच्यादिवशी गल्लीतील मंडपात दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याठिकाणी रोज महाआरती करण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. रोज सायंकाळी महाआरती झाल्यानंतर सर्वांसाठी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. विविध महिला मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे.









