आचरा / प्रतिनिधी-
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे रामेश्वर मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना दिमाखात झाली . यावर्षी २१ दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त देशभक्तीपर समुह गीत स्पर्धा, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा, जोडी नृत्य स्पर्धा, विविध मंडळाचे दशवतार, भजने सादर होणार आहेत.
सोमवार १९ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रात्रौ १० वाजता बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. मंगळवार २० सप्टेंबर रोजी आचरा समुद्र किनारी ढोलताशांच्या गजरात विसर्जन होणार आहे. तरी या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद मिराशी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक पाडावे यांनी केले आहे.