Various programs on the occasion of Gajanan Maharaj Manifest Day at Malewad on 13
श्री गजानन महाराज मंदिर प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मळेवाड येथे सोमवार १३ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सोमवार १३ रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा , सकाळी ९.३० ते १२ वाजता रुद्रार्चन व शिवकवचानुषठान , व धार्मिक कार्यक्रम , दुपारी १२.३० ते १. वाजता महाराजांची महाआरती प्रकट समय , दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद , दुपारी २.३० ते ४ पर्यंत अक्षय नाईक प्रस्तुत ‘ स्वरअक्षय ‘ गायनाचा कार्यक्रम दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता गोवा केरी येथील भक्तिरस हा गायनाचा कार्यक्रम , सायंकाळी ६ ते ७ वाजता स्वराभिषेक साटेली यांचे भजन , रात्री १० वाजता ‘ ढ मंडळी कुडाळ यांची ‘ बिलीमारो एकांकीका त्यानंतर रात्री १० वाजता ‘ ढ मंडळी कुडाळ यांची ‘ वाल्मिकी एकांकीका होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळाने केले आहे .
न्हावेली / वार्ताहर









