वेंगुर्ले (वार्ताहर)-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” (मिट्टी को नमन, वीरों को वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असून या अंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, मातृभूमीसाठी झटणाऱ्या तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा या उद्दात हेतूने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर तिरंगा फडकावून वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वातंत्र्य सेनानी कै. गणेश महादेव गुरव यांचा मुलगा विजय गणेश गुरव व कै. बाळकृष्ण शिवराम पडवळ यांचा मुलगा विलास पडवळ यांचा सन्मान मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व माजी नगरसेवक सुहास गवंडळकर व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सकाळी 8 वाजता वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्त्रोत निशाण तलाव येथे वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृत सरोवर अभियान अंतर्गत सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, ज्येष्ठ नागरीक दिनकर परब व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर सकाळी 10 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित तिरंगा रॅलीची सुरुवात वेंगुर्ला हायस्कूल पासून करण्यात आली. सदर तिरंगा रॅलीमध्ये नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, वेंगुर्ला हायस्कूल व बॅ. खर्डेकर कॉलेजचे विदयार्थी तसेच शिक्षक व शहरातील बहुसंख्य नागरीक सहभागी झाले. ही तिरंगा रॅली वेंगुर्ला हायस्कूल – हॉस्पीटल नाका-नगरपरिषद कार्यालय–मार्केट–दाभोली नाका-शिरोडा नाका–रामेश्वर मंदीर रोड- पॉवर हाऊस–घोडेबाव गार्डन या मार्गे काढण्यात आली. या तिरंगा रॅलीस देशप्रेमी वेंगुर्लावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून ‘’माझी माती माझा देश’’ या अभियानाचा समारोप केला.









