घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण
बेळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्री रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त घुमटमाळ येथील मारुती मंदिरामध्ये दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते 8 यावेळेत सामूहिक ‘हनुमान चालिसा पठण’ करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव होणार आहे. नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाडगी यांनी केले आहे.
अर्चना संगीत विद्यालय
रॉय रोड, टिळकवाडी येथील अर्चना संगीत विद्यालयातर्फे दि. 22 रोजी सायंकाळी 6 ते 7 यावेळेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सायंकाळी 6 ते 7 यावेळेत श्रीरामांची भजने म्हणण्यात येणार आहेत. सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अर्चना बेळगुंदी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
गजानन महाराज (शेगांव) भक्त परिवार
टिळकवाडी येथील श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त परिवार केंद्रातर्फे श्रीराम मूतीं प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, 7.30 वाजता श्रींची आरती, सकाळी 11.30 वाजता श्री राम प्रतिमा पूजन, दुपारी 12 वाजता आरती व प्रसाद वाटप, रात्री 7 वाजता मंदिरामध्ये दीपोत्सव व रात्री 9 वाजता शेजारती होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
पहिले रेल्वेगेट, टिळकवाडी साई मंदिर
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त पहिले रेल्वेगेट, टिळकवाडी येथील साई मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









