दोडामार्ग – वार्ताहर
सार्वजनिक गणेशोत्सव – नवरात्रोत्सव मंडळ दोडामार्ग या मंडळाचा सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्रौत्सव विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.सोमवार दि. १६ ऑक्टोंबर रोजी सायं. ४ वा. चित्रकला स्पर्धा लहान गट व मोठा गट अशी होणार आहे. तर रात्रौ ९.३० वा. श्री जोगेश्वरी दांडीया ग्रुप पिसुर्ले – गोवा यांचा दांडीयाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. १७ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वा. पाककला स्पर्धा, सायं. ५ वा. महिलांचे भजन ,रात्रौ ०९.३० वा. श्री सातेरी दांडीया ग्रुप, इब्रामपुर – गोवा, खडपेश्वर दांडीया ग्रुप वळपे – गोवा, आरएसटी दांडीया ग्रुप थिवीम- गोवा आदींचे दांडिया होणार आहेत. बुधवार दि. १८ ऑक्टोंबर रोजी सायं. ४ वा. पाककला स्पर्धा (मुलांसाठी), रात्रौ. ९ वा. खेळ पैठणीचा हे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दि. १९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. श्री दुर्गामाता पुजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सांय. ५ वा. भजन, आरती, गरबा, सांस्कतिक कार्यक्रम रात्रौ ९.३० वा. लावणी स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर रोजी सायं. ७ वा. श्री राष्ट्रोळी दत्त भजन मंडळ दोडामार्ग यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ९.३० वा. स्टेज शो (फॅन्सी ड्रेस, कविता वाचन, रेकार्ड डान्स वगैरे), शनिवार दि. २१ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वा. फळांवरील कोरीव काम कोशल्य, रात्रौ . ०९.३० वा. स्टेज शो होणार आहे. रविवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वा. फुगडी स्पर्धा, रात्रौ ०९.३० वा. जागतिक किर्तीचे महान जादूगार वैभवकुमार यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. सोमवार दि. २३ ऑक्टोंबर रोजी ल रात्रौ ०९.३० वाजता स्टेज शो व मंगळवार दि. २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वा. आरती, गाऱ्हाणी, उत्तरपुजा, सायं. ०४.४५ वा. पावणी सायं. ६ वा. विसर्जन मिरवणुक होणार आहे तरी या नवरात्रौत्सवास सर्व भाविक, भक्तांनी, शहरवासीयांनी तसेच तळुकावासियांनी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव – नवरात्रौत्सव मंडळ दोडामार्ग यांनी केले आहे.









