प्रतिनिधी
बांदा
श्री देवी माऊली मंदिर डेगवे येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रोज रात्री ८वाजता आरती होईल.रविवार १५ रोजी सायंकाळी ४ वाजता मोरगाव येथील महिलांची फुगडी, ६ वाजता खालची मोयझरवादी व वराडकरवाडी मंडळाचे भजन, रात्री९ वाजता कुमारी आरती बापट नारिंगे ता.देवगड हिचे सुश्राव्य कीर्तन, सोमवारी १६रोजी रात्रौ ८.३०वाजता जांभळवाडी खालची भजन मंडळाचे भजन, रात्रौ९ वाजता चेंदवणकर गोरे दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग, मंगळवारी १७रोजी सायंकाळी ८ वा वरची फणसवाडी भजन मंडळाचे भजन, रात्रौ९वाजता परमपूज्य श्री नामदेव महाराज भजन मंडळ आदुर्ले कुडाळ संगीत विशारद बुवा आनंद मोर्ये यांचा कार्यक्रम, बुधवारी १८रोजी रात्रौ ८.३०वा वरची जांभळवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९.३०वाजता श्री देव राईकर प्रासादिक भजन मंडळ इन्सुली बुवा उदय मेस्त्री यांचा भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर श्री देव सावंतवस भजन मंडळ इन्सुली बुवा वैभव राणे यांचा भजनाचा कार्यक्रम, गुरुवारी 19 रोजी रात्री ८.३०वाजता माजगाव सावंतवाडी यांचे भजन, ९.३० वाजता आंबेखणवाडी भजन मंडळाचे भजन, शुक्रवारी 20 रोजी रात्रौ ८.३०वाजता आंबेखणवाडी भजन मंडळाचे भजन, ९.३०वाजता श्री देव गंगोबा नाट्यमंडळ ओवळीये यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, शनिवारी २१ रोजी सायंकाळी ६वाजता बाजारवाडी खालची फणसवाडी भजन मंडळाचे भजन, रात्रौ८.३०वाजता हासापूर गोवा यांचे घुमट भजन, रविवारी २२ रोजी दुपारी ३.३० वाजता स्थानिक महिलांची फुगडी, सायंकाळी६.३०वाजता वरची मोयझरवाडी भजन मंडळाचे भजन, रात्रौ ८.३०वाजता बुवा संजय गावडे विरुद्ध दीपक खरूडे यांच्या डबलबारी भजनाचा कार्यक्रम, सोमवारी सकाळी९.३०वाजता होम हवन, आरती, तिर्थप्रसाद दुपारी ३ वाजता ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ८.३०वाजता कुमारी ऋचा संजय पिळणकर माणगाव यांचे सुश्राव्य कीर्तन (आयोजक सरस्वती चुडे प्रतिष्ठान मोयझरवाडी) , मंगळवारी सायंकाळी ४वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमीटी डेगवे यांनी केले आहे.









