प्रतिनिधी
बांदा
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ निमजगा येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 20 रोजी बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर पुरस्कृत श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचे ट्रिकसीनयुक्त शिर्डी माझे पंढरपूर नाट्य प्रयोग होणार आहे. यामध्ये साईबाबांच्या प्रमुख भूमिकेत घारपी येथील विजय गावकर असणार आहेत. या नाटकात कैलास पर्वतावर शंकर दर्शन, प्रेक्षकातून घोडी येणे, जमिनीतून अग्नी प्रज्वलित होणे, आपोआप जात्यावर दळण दळणे, पाण्याने पणत्या पेटणे, रंगमंचावर विठ्ठल दर्शन , प्रयाग तीर्थाचे दर्शन , प्रेक्षकामधून साईंची पालखी, साईबाबांचे महानिर्वाण आदी ट्रिकसीन होणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा नाट्य रसिकांनि लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.









