Various competitive events on the occasion of the birthday of former MP Brigadier Sudhir Sawant
समृद्ध आणि आनंदी गाव संकल्पनेचे प्रणेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पहिली राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग सिलंबम लाठीकाठी स्पर्धा बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे पार पडल्या यामध्ये समृद्ध आणि आनंदी गाव योजनेअंतर्गत खेळांचा विकास कराटे व स्वतः संरक्षण या बाबींचा समावेश असून या क्रीडा स्पर्धा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग व सिंधुदुर्ग जिल्हा सिलबम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन अनिरुद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद संदीप सावंत यांनी केलं. उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक विवेक राणी यांनी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांमध्ये 48 ते 51 वजनी गटांमध्ये कुमार सोहम महिंद्रकर (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) याला प्रथम 51 ते 54 वजनी गटांमध्ये कुमार नित्य पारकर (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली) हिला प्रथम तसेच 60 ते 65 वजनी गटांमध्ये कुमार अमेय राणी डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल याला प्रथम क्रमांक प्राप्त झालाय सतरा वर्षाखालील मुलींमध्ये (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम) स्कूलच्या खेळाडू दिशा पवार हिला 44 48 वजनी गटांमध्ये प्रथम क्रमांक तर 52 ते 56 वजनी गटांमध्ये खूप वैष्णवी राणी हिला प्रथम क्रमांक प्राप्त झालाय.
सिलंबम या खेळ प्रकारात 14 वर्षाखालील मुलांमध्ये सोहम खवणेकर (सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज )अंबोली याला प्रथम क्रमांक तर कुमार दीप सुतार याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला 14 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक कुमारी रश्मि रासम डॉन बॉस्को उरूस हिला प्रथम क्रमांक कुमारी ज्ञानपरी ठोंबरे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली हिला द्वितीय क्रमांक तर कुमारी मनस्वी सुतार बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला 14 वर्षाखालील मुलांमध्ये कुमार मीत मुळे याला प्रथम क्रमांक कुमार आणि याला द्वितीय क्रमांक सोहम महेंद्रकर याला चतुर्थ क्रमांक व पियुष दळवी याला पाचवा क्रमांक प्राप्त झाला. यशस्वी सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी अभिनंदन केलं.
डिगस प्रतिनिधी









