दोडामार्ग – वार्ताहर
पिंपळेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ तर्फे आयोजित यंदाच्या नवरात्रोत्सवात शिवशक्ती डान्स अकॅडमी तर्फे पिंपळेश्वर हॉलमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
१४ वर्षाखालील चित्रकला स्पर्धेत श्रीयोग राजेंद्र पाटील भेडशी प्रथम क्रमांक, तन्वी चंदन गाड खोलपे गोवा द्वितीय, सावी अमित राणे दोडामार्ग तृतीय, पाककला स्पर्धेत अथांग मंदार मणेरीकर दोडामार्ग प्रथम, स्वामिनी दीपक बुगडे दोडामार्ग द्वितीय व तिथी प्रशांत आर्लेकर दोडामार्ग तृतीय, वेशभूषा स्पर्धेत रामा बांदेकर सावंतवाडी प्रथम, अद्विका मनीष नाईक दोडामार्ग द्वितीय, चिंतन सुरेश उगाडेकर दोडामार्ग तृतीय, कविता वाचन स्पर्धेत चिंतन सुदेश उगाडेकर प्रथम, साईश सुरेश देसाई केर द्वितीय स्वामिनी दीपक बुगडे दोडामार्ग तृतीय, फळ व भाजी कोरीवकाम स्पर्धेत गुंजन अजय गावडे दोडामार्ग प्रथम, अन्वी नितीन मणेरिकर दोडामार्ग द्वितीय, स्वामिनी दीपक बुगडे तृतीय, १८ वर्षाखालील चित्रकला स्पर्धेत ऐश्वर्या एकनाथ नाईक दोडामार्ग प्रथम, तन्वी सुनील गवस खोलपे गोवा द्वितीय व सिद्धी बाबली नाईक खोलपे गोवा तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण ८० जणांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी शैलेश गोवेकर, नितीन मणेरीकर, प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर, मिलिंद नाईक, आनंद कामत, ओंकार कुलकर्णी, समीर करमळकर, आरती नाईक हे पुरस्कर्ते होते. शिवाय काहींनी देवीची नवरुपे साकारली होती. ऐश्वर्या एकनाथ नाईक हिने शैलपुत्री, अंकिता अशोक पालयेकर ब्रह्मचारिणी, सुप्रिया संजय दळवी चंद्रघंटा, संजना महादेव जाधव कुष्मांडा, अंकिता संदेश सांबारी स्कंदमाता, वैदवी विशाल परमेकर कात्यायनी, सीमंतिनी प्रशांत नाईक कालरात्री, माधवी लवू गवस महागौरी व दीक्षा सतीश कुबल हिने सिद्धीपात्री अशी रूपे साकारली होती.









