30 रोजी मंडळाचा 60 वा वर्धापनदिन, 1 रोजी पुरस्कार वितरण सोहळा

प्रतिनिधी /फातोर्डा
कोकणी भाषा मंडळाने यंदाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. मंडळ 30 रोजी आपला 60 वा वर्धापनदिन साजरा करणार असून या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर असे दोन दिवस विविध उपक्रम आयोजित केले आहेत. वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा 1 रोजी सायंकाळी 4 वा. गोमंत विद्या निकेतनच्या सभागृहात होणार आहे. यंदा हीरक महोत्सवानिमित्त मंडळातर्फे पाच सेवा पुरस्कार आणि पाच कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचे जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत-कोकणी भाषा मंडळ सेवा पुरस्कार ः मार्टीन मिनीन फर्नांडिस, गुरुदास सामंत, उदय देशप्रभू, प्रभाकर भिडे व अर्चना कामत, फेलिसियो कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार ः कृष्णाबाई (बीना) नायक, जुझे पिएदाद क्वाद्रुस स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार ः गोपीनाथ गावस, अपर्णा गारुडी, रेवणसिद्ध नाईक, राजदीप नाईक, ऍड. जॉन फर्नांडिस, लिगोरियो फुर्ताद ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार ः प्रमोद आचार्य, चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार ः मुकेश थळी.
रामनाथ मणेरकर स्मरणार्थ अनुवाद पुरस्कार ः सुनेत्रा जोग (पुस्तक-सैनिक), स्व. नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार ः फा. सुकूर रिबेलो (पुस्तक-खेळ खेळूया), स्व. रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार ः अरविंद भाटीकर (पुस्तक-कर्मण्ये), रमेश वेळुस्कर स्मरणार्थ साहित्य पुरस्कार ः सु. म. तडकोडकर (पुस्तक-कोकणी चंपू काव्य गायत्री देवी), मनोहरराय सरदेसाई स्मरणार्थ बालसाहित्य पुरस्कार ः अविनाश कुंकळय़ेकर (पुस्तक-शेणिल्लें भुरगेपण).
विविध पुरस्कारांसाठीच्या परीक्षक मंडळावर वसंत सावंत, डॉ. प्रकाश पर्येकर, ब्र. जॉन आफोंसो, प्रशांती तळपणकर, रामनाथ गावडे, नयना आडारकर, नारायण मावजो, संदेश प्रभुदेसाई, झिलू गावकर, डॉ. पूर्णानंद च्यारी, सॅराफीन कॉता, प्रशांत नाईक, अरुणा पाटणेकर, डॉ. भूषण भावे, अनंत अग्नी, अनिल पै, प्रकाश कामत आणि मार्पुस गोन्साल्वीस यांनी काम पाहिले.









