Various activities to be implemented for Vengurle city beautification competition-Chief Kankal
स्वच्छतेच्या दुसऱ्या टप्प्यांत राज्यस्तरावर शहर सौदर्यीकरण स्पर्धा आहे. त्याअंतर्गत वेंगुर्ले नगरपरीषदेच्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी आकर्षक अशा स्वरूपाचे कोकणची संस्कृती व वेंगुर्लेतील पर्यटन स्थळे दर्शविणाऱ्या प्रतिकृती व वॉलपेटींग तसेच मुख्य चौक सुशोभिकरण करणे अशा कांही गोष्टी करण्यात येणार आहेत. दिवाळीत खास आकर्षण म्हणून बनविल्या जाणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती तसेच स्थानिक पातळीवर विशेष लक्ष पडेल अशा प्रतिकृती ज्या ज्या भागातील नागरिकांतून साकारल्या जातील, त्यांना विशेष प्राधान्य देण्यातं येतील. वेंगुर्ले नगरपरीषद हि स्वछतेचा वसा कायम ठेवून सौदर्यीकरणांत सुध्दा राज्यात नाव लौकीक करेल. अशा विश्वास वेंगुर्ले नगरपरीषदेचे नुतन मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ यांनी `नगरपरीषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ येथे आयोजित पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.
वेंगुर्ले नगरपरीषदेच्या गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कचरा संकलन केंद्रामधील व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाला होता. त्यामुळे दुर्गधीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. गेल्या 15 दिवसांपूर्वी नुतन मुख्याधिकारी श्री कंकाळ यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम कंपोस्टबाग म्हणजे स्वच्छ पर्यटन स्थळाकडे लक्ष केंद्रीत केले. या कचरा संकलन केंद्रातील बर्याचश्या मशिनरी बंदावस्थेत आढळल्या. बायोगॅस प्रकल्प, बायो कंपोस्टींग मशिन, प्लॅस्टिक बेलिंग मशिन, एस.टी.पी. प्लॉंट, प्लॅस्टिक क्रशर मशिन या बंद अवस्थेत असल्याने या कचऱा संकलन केंद्रात कचऱ्याचा ढिग जमा झाला होता. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम मशिनरी चालू करणे हे गरजेचे होते. त्यादृष्टीने काम करत सर्व मशिनरी चालू करण्यात आल्या असून उर्वरीत एक-दोन मशिनरी आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री. कंकाळ यांनी दिली.
वेंगुर्ले (वार्ताहर)-