महिला,मुंलीसाठी विविध महास्पर्धा
वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री. वारणा महिला उद्योग समूहाच्या तसेच वारणा साखर कारखान्यांच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई विलासराव कोरे यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज रविवार दि.८ रोजी दिव्य शोभाई स्मृर्तीपर्वास शानदार प्रारंभ झाला. यानिमित्ताने भरवलेल्या प्रदर्शन व विक्रीस सुरवात झाली.
वारणानगर ता. पन्हाळा .येथील शिक्षण समूहाच्या शिवनेरी क्रिडांगणावर सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था, आणि सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने या स्मृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या प्रतिमेचे तसेच तुलशी चे पुजन सावित्री औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.शुभलक्ष्मी कोरे तसेच दिपप्रज्वलन करून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रदर्शनात सुमारे १५० विविध स्टॉल सहभागी झाले असून स्वतंत्र खाद्य पदार्थ विभाग, वस्त्रअलंकार विभाग असून प्रदर्शनासाठी स्वतंत्र पावसापासून संरक्षित मंडप उभारला आहे तसेच प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून महिलांसाठी विविध वस्तू इमिटेशन ज्वेलरी, साड्या, चप्पल्स, बँगल्स, मेकअप साहित्य, पारंपारिक मातीच्या लाकडी व दगडी वस्तू असून विक्री पश्चात सेवा मिळणाऱ्या होम अप्लायन्सेसच्या विविध वस्तूंवर ५० टक्के सवलत मिळणार आहे.महिला आणि मुलींसाठी विविध महास्पर्धास सोमवार दि. ९ रोजी सकाळी प्रारंभ होणार आहे. यामध्ये सकाळी १० ते ४ वा.महिला भजन स्पर्धा,सायं. ५ वा. सरप्राईज स्पॉट गेम, सायं. ५.३० ते सायं. ६.३० ब्युटी पार्लर वेशभूषा सकाळी ९ ते रात्री ९ वा मूळ कला कुसर कॉस प्रदर्शन होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी वारणा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव पाटील, संचालक शहाजीराव पाटील,उदय पाटील, सुभाष जाधव, कार्यकारी संचालक शहाजी भगत, वारणा बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील समूहातील इतर संस्थाचे संचालक उमेदचे अधिकारी सचिन पानारी उपस्थित होते.दिव्य शोभाई स्मृर्तीपर्वा चे समन्वयक प्रा.जीवनकुमार शिंदे, संग्राम दळवी, राजेंद्र पाटील, विकास चौगुले, उदय पाटील यांनी या प्रदर्शनाचे नेटके संयोजन केले आहे. सौ. शिल्पा पाटील यानी सूत्रसंचलन केले.