ऑनलाईन टीम/तरुण भारत
वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid) शिवलिंग सापडले असून त्याची पूजा करण्यासाठी काही संत तेथे पोहोचले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना पूजा करण्यास नकार दिला आहे. स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद (Swami Abhimukteshwarananda)यांना नजरकैदेत ठेवलं आहे. असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवले आहे.
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद म्हणाले, “मी प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे की आम्हाला ज्ञानवापी मशिदीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मागे ठेवलं आहे. केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी.”
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद (Swami Abhimukteshwarananda) यांनी आश्रमाच्या गेटवर धरणे आंदोलन पुकारले. जोवर आरती करण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, असा इशारा स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी दिला आहे. तसेच, ज्ञानवापी शिवलिंगची पूजा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले.