तालुकास्तरीय नेटबॉल स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय नेटबॉल स्पर्धेत प्राथमिक-माध्यमिक नेटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्स, वनिता विद्यालय, डीपी, सेंट झेवियर्स, लिटल स्कॉलर संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन वनिता विद्यालयाच्या प्रा. डॉ. निर्मला सुनत, टिळकवाडी शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवण्णावर, सिल्व्हीया डिलिमा, माजिया व एस. व्ही. हेगनायक आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित संघांच्या खेळाडूंची ओळख करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. प्राथ-माध्य विभागात मुलांच्या 10 संघानी तर मुलींच्या 11 संघानी तर एकूण 21 संघानी भाग घेतला होता. दिवसअखेर 17 वर्षाखालील माध्यमिक मुलांच्या गटात सेंट झेवियर्स, वनिता विद्यालय संघानी तर मुलींच्या विभागात डीपी व वनिता विद्यालय संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला. 14 वर्षाखालील मुला-मुलींच्या विभागात सेंट झेवियर्स व लिटल स्कॉलर संघानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. यावेळी क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारिओ, संजू एम., बालेश यादुरी, मारिया बेलवाड व इतर क्रीडा शिक्षक उपस्थित होते.









