ऑनलाईन टीम/तरुण भारत
सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करावं लागणार आहे. याची घोषणा राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याचा सरकारी अध्यादेश आज (शनिवार) काढण्यात आला. वर्ध्यातून या नव्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम’ या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानानुसार, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता फोन, मोबाईलवर तसेच बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे लागणार आहे. (Now say Vande Mataram instead of Hello on telephone Maha Govt issued GR)
‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याबाबतचा शासन निर्णयही सरकारने जारी केला आहे. मात्र, वंदे मातरम बोलण्याची सक्ती नसेल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. आज या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : पाकिस्तान सरकारच्या Twitter अकाउंटवर भारतात बंदी
शासनाने या अभियानात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासकीय कार्यालयात दूरध्वनी अथवा परस्परभेटीत संवाद साधताना कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्टता नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना ‘हॅलो’ हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला आणि संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक अभिवादन करणारा शब्द आहे.