खासदार जगदीश शेट्टर – इराण्णा कडाडी यांनी केले स्वागत
वार्ताहर/घटप्रभा
बेळगाव-मिरज रेल्वे मार्गावरील घटप्रभा रेल्वेस्थानकात प्रमुख रेल्वे स्थानक असून अनेक दिवसांपासून या भागातील रेल्वे प्रवाशांची मागणी असलेल्या वंदे भारत एक्प्रेसचा थांबा मिळाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी घटप्रभा रेल्वे स्थानकातील जमलेल्या नागरिकांनी जल्लोष करीत भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणासह भव्य स्वागत करण्यात आले. वंदे भारत एक्प्रेस सायंकाळी 7.40 वा. घटप्रभा स्थानकात येत असताना बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि राज्यसभा सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी हिरवा झेंडा दाखवत वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित समारंभात बोलताना जगदीश शेट्टर व इराण्णा कडाडी यांनी गत 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नागरिकांना सेवा सुविधा मिळत आहेत. तसेच घटप्रभा रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असून विकासकामेही सुरू आहेत, असेही सांगितले.









