ओरोस : प्रतिनिधी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या मंडळामार्फत घेण्यात आलेल्या संस्कृत भाषा प्रवेशः( द्वितीया)या परीक्षेत सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु.ll ता.कुडाळ या शाळेतील 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 23 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत कुमारी वंदना मंगेश पवार ही विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यात प्रथम आली. या तिच्या यशाबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. रामचंद्र पांडुरंग पिकुळकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे संस्थाध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत, सचिव श्री. संभाजी वळंजू, मुख्याध्यापक श्री. सचिन धुरी, संस्था सदस्य ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









