ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधान मोदींना मी दारुडा म्हणणार नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. ते धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला क्रिकेट क्लब मैदानात (Akola Cricket Club Ground) आयोजित धम्म मेळाव्यात बोलत होते.
यवेळी बोलताना त्यांनी भारताच्या अर्थव्यस्थेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. तसेच सत्ताधारी पक्ष हा भांडवलदारांचा असून अर्थव्यवस्थेची अवस्था दारुड्यासारखी झालीय. परिस्थिती अशीच राहिल्यास प्रचंड आर्थिक संकट ओढावेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे ही वाचा : मोदी सरकारने सरन्यायाधीशांकडे मागितलं उत्तराधिकाऱ्याचं नाव
दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकरी चळवळीतील मंत्र्यांच्या खुर्चीला चिकटून असलेल्या नेते आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या विचारवंतांना आंबेडकर यांनी फैलावर घेतले. लोकसेवक म्हणून सत्ता चालविणारे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरांचे एक उदाहरण आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. दादू इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये (SharadPawar) नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.