मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील आरे वनक्षेत्रात एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनला दिले आहेत. यासंदर्भात १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे. दरम्यान आज वंचित आघाडी आणि आम आदमी पार्टीने यात उडी घेत विरोध केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात वंचित आघाडीने घोषणाबाजी केली. तर आपच्या कार्यकर्त्यांनी आज झाडांना राखी बांधली. आरेतील वृक्षतोड थांबावी अशी मागणी दोन्ही कार्यकर्ते करत आहेत. ज्या पध्दतीने मनुष्याला जगायला अन्न, वस्त्र, निवारा लागतो तसेच शुध्द हवेसाठी. ऑक्सिजनसाठी झाडांची गरज लागते. तुमचा प्रकल्प दुसरीकडे करा आम्ही झाडे तोडू देणार नाही अस म्हणत विरोध करण्यात आला.
हेही वाचा- Tattoo And AIDS: उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार; एकच सुई वापरल्यानं 14 जणांना एड्सची बाधा
मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. वृक्षतोड होत असल्याच्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील आरे वनक्षेत्रात एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनला दिले आहेत. तसेच याप्रकरणी सविस्तर सुनावणी करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करत सुनावणी योग्य खंडपीठासमोर घेण्याबाबत 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल असे खंडपीठाने स्पष्ट केले.
Previous Articleदेवगडमधील मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article जिल्ह्यात पावसाची संततधार









