वारणानगर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी त्यास जोडणारे रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी,शाळेच्या आवारात, स्वत्तांचे अंगणात, गोठा परिसर तसेच बोरपाडळे राज्यमार्गाला लागून प्रकल्पावर बारा वर्षात ५० पेक्षा अधिक विविध प्रजातिच्या ४००० वृक्षांची यशस्वी जोपासना केल्याने वन शोभाश्री २०२३ पुरस्कार मिळाल्याचे पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र जाधव यानी सांगितले.
श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यांच्या नर्सरी विभागाच्या वतीने माजी अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या स्मृर्ती प्रित्यर्थ दिला जाणारा वन शोभाश्री २०२३ पुरस्कार संचालक रविंद्र जाधव यांना जाहिर झाला आहे त्याचे वितरण गुरुवार दि.१२ ऑकटोबर रोजी आहे या पार्श्वभूमीवर जाधव यानी वृक्ष लागवड त्याचे संगोपन याबाबत विस्तृत माहिती दिली.
वडील स्वर्गीय आनंदराव जाधव, बंधू बाळासाहेब जाधव यांचा राजकीय सामाजिक वारसा त्यामुळे सलग २० वर्षे बहिरेवाडीचे सरपंच, पन्हाळा पंचायत समितीचे १० वर्ष सदस्य त्यामध्ये ३ वर्ष उपसभापती तसेच वारणा साखर कारखाना संचालक तसेच विविध संस्थेतील पदे सांभाळत वृक्ष लागवडीची लहानपणापासून आवड यामुळे वृक्ष लागवडीचा छंद जोपासला वृक्ष लागवड करताना त्याच्या संगोपनाचे नियोजन केले प्रसंगी टॅकरने काही वर्ष पाणी देवून वृक्ष वाढवले आज ३५०० पेक्षा अधिक झाडे पूर्ण वाढ झाली असून त्यास फलधारणा देखील हंगामानुसार होत आहे या कार्यांची दखल म्हणून वन शोभाश्री पुरस्कार मिळाल्याचे समाधान सरपंच रविंद्र जाधव यांनी व्यक्त केले.









