प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता भुवन बामच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. ढिंढोरा आणि ताजा खबर वेबसीरिजमध्ये त्याने स्वत:च्या अभिनयाचे प्रदर्शन केले होते.
आता निर्माता करण जौहरने त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. करण जौहर स्वत:च्या आगामी कौटुंबिक मनोरंजन चित्रपटासोबत प्रेक्षकांसमोर एक नवी जोडी सादर करणार आहे. करणने वामिका गब्बी आणि भुवन बामला एक अनोखा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘कुकू की कुंडली’साठी करारबद्ध केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करणार आहे. शरण शर्माने यापूर्वी ‘गुंजन सक्सेना :द कारगिल गर्ल’चे दिग्दर्शन केले आहे. वामिका सध्या चित्रपट अन् वेबसीरिजमध्ये काम करणारी सर्वात लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. जुबली, खुफिया, भूल चूक माफ या चित्रपट अन् वेबसीरिजमधील अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळविणाऱ्या वामिकाला सध्या अनेक मोठ्या संधी प्राप्त होत आहेत. ‘कुकू की पुंडली’ चित्रपटात कौटुंबिक मनोरंजनाची कहाणी असणार आहे.









