खेड :
कोकण मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी–मंगळूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील 5 हजार रुपये रोख व 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. ही घटना कळंबणी रेल्वेस्थानकानजीक घडली. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभा शेखर (57, रा. मार्गोवा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्या 12133 क्रमांकाच्या सीएसएमटी–मंगळूर एक्स्प्रेसमधील ए-1 31 व 32 आसनावरुन प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्या झोपल्या असल्याची संधी साधत चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. ही घटना 3 मार्च रोजी मध्यरात्री 3 च्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.








