अनेक ठिकाणी फॉगिग : सतर्कता बाळगण्याचे आवाहन : तपाचे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
वाळपई : सध्या राज्यात डेंग्यूच्या ऊग्णांत वाढ होत आहे. यामुळे वाळपई सरकारी सामाजिक ऊग्णालय सतर्क झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी फॉगिंग व जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असून ताप आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. वाळपई सरकारी सामाजिक ऊग्णालयात एकूण दोन डेंग्यू ऊग्णांची नोंद झाली आहे. सदर ऊग्ण हे कांदोळी भागामध्ये कामाला जात असतात. सदर भागातून त्यांना या संदर्भाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र स्थानिक पातळीवर अद्याप एकही ऊग्ण सापडलेला नाही. तरीसुद्धा डेंग्यूसंदर्भात जनजागृती व्हावी व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सामाजिक ऊग्णालयाची यंत्रणा सतर्क झालेली आहे. आतापर्यंत सत्तरी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये डेंग्यू संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी. ताप आल्यास कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भाची माहिती ऊग्णांना देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. अनेक गावांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केलेली आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी मच्छरचा पैदास वाढलेला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉगिंग प्रक्रिया हाती घेतली आहे. मच्छरवर नियंत्रण राखण्यासंदर्भात काळजी घेण्यात आलेली असून अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नागरिकांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारचे सहकार्य करावे, अशा प्रकारची विनंती ऊग्णालयाच्या यंत्रणेकडून करण्यात आलेली आहे. वाळपई ऊग्णालयात नोंद झालेले दोन डेंग्यू ऊग्ण सरकारी नोकर आहेत. ते सध्यातरी कांदोळी भागामध्ये कामाला असतात. सदर भागांमध्ये डेंगू ऊग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागल्यामुळे त्या दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचा अधिक्रायांचा दावा आहे. मात्र स्थानिक पातळीवर अद्याप एकही ऊग्णांची नोंद झालेली नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पाणी साठवून ठेवू नका!
कोणत्याही ठिकाणी पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे वाळपई सामाजिक ऊलायाचे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत जनजागृती घेत आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होत आहे तो नष्ट करणे व ठिकठिकाणी मच्छर नियंत्रण औषधांची फवारणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ज्यांना ताप येत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन ऊग्णालयातर्फे करण्यात आलेली आहे.
स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे !
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सुद्धा नागरिकांनी या संदर्भात सतर्कता बाळगावी . लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा व उपचार सुरू करावे, असे आवाहन केलेले आहे. 2 ऑक्टोंबर रोजी तालुक्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, आवाहनही त्यांनी केले आहे.









