वाळपई, मासोर्डे मंदिरात श्रीफळ ठेवून शिमगोत्सवाला प्रारंभ
वाळपई : गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने गुऊवार दिनांक 16 रोजी होणाऱ्या सत्तरी तालुका शिमगोत्सव समिती आयोजित लोकोत्सव 2023ची तयारी पूर्ण झालेली आहे. यामध्ये लाखो ऊपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. बुधवारी मासोर्डे येथील शांतादुर्गा महादेव रवळनाथ व वाळपई येथील हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ ठेवून या शिमगोत्सवाची सुऊवात झाली आहे. यावेळी शिमगोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने 16 मार्च रोजी वाळपई येथे शिमगोत्सत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आर्थिक दृष्ट्या सहकार्य करून बक्षिसामध्ये भरघोस वाढ केल्यामुळे यंदाच्या शिमगोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभणार आहे. यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात गोव्यातील चित्ररथ, लोकनृत्य पथके भाग येणार आहेत. आयोजन समितीकडून प्राप्त माहितीनुसार, आज संध्या. 5 वा. राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी पहिले पारितोषिक रु. 1 लाख दुसरे रु. 60 हजार तिसरे रु 50 हजार चौथे रु. 40 हजार पाचशे 30 हजार व उत्तेजनार्थ 14 बक्षीस प्रत्येकी रु. 10 हजार अशी जाहीर करण्यात आलेली आहे.
रोमटामेळ स्पर्धेचे पहिले पारितोषिक रु. 70 हजार दुसरे रु.40 हजार तिसरे रु. 30 हजार चौथे रु.20 हजार पाचवे रु. 14 हजार व उत्तेजनात प्रत्येकी 8 हजार रुपयांची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. लोकनृत्य स्पर्धा दु. 3 वा. पालिकेच्या व्यासपीठावर होईल. यासाठी प्रथम पारितोषिक रु.35 हजार दुसरे 25 हजार तिसरे 20 हजार चौथे 17 हजार पाचवे रु. 10 हजार व उत्तेजनार्थ 10 बक्षिसे प्रत्येकी रु. 8 हजार जाहीर करण्यात आलेली आहेत. दोन गटांत वेशभूषा स्पर्धा होणार आहे यामध्ये ब गटासाठी प्रथम रु. 4 हजार दुसरे रु. 2 हजार, तिसरे 1 हजार तर क गटात पदासाठी प्रथम रु. 8 हजार दुसरे रु. 6 हजार व तिसरे रु. 4 हजार अशी बक्षीचे जाहीर करण्यात आलेली आहेत. आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजता वाळपई फॉरेस्ट हाऊस या कडून सार्वजनिक गाऱ्हाणे सांगून या स्पर्धेची सुऊवात होणार आहे. यामध्ये गोवा राज्याचे आरोग्य मंत्री तथा समितीचे अध्यक्ष विश्वजीत राणे समितीच्या कार्याध्यक्ष तथा आमदार डॉ. देविया राणे समितीचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणूक सुरू होणार आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे पुणे महाराष्ट्र येथील पुणे महाराष्ट्र येथील 130 कलाकारांचा समावेश असलेले ऊद्र गर्जना ढोल ताशा वाद्य पथक व पुणे येथील शिवगर्जना वाद्यपथक यांचे खास सादरीकरण यायावेळी होणार आहे. यावेळी वाळपई नगरपालिकेच्या व्यासपीठावर लावणी, सिनेडान्स, कथक अशा विविध कलांनी भरलेला विशेष नजराणा रात्री 7 वाजता ‘मनोमय’ सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व प्रेक्षकांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शिमगोत्सव पदाधिकाऱ्यांनी मासोर्डे येथील रवळनाथ, शांतादुर्गा देवीच्या चरणी नारळ ठेवून याची सुऊवात केली .त्यानंतर वाळपई येथे श्री हनुमान मंदिरात नारळ ठेवून या संदर्भात देवाचे आशीर्वाद घेण्यात आले.









