अर्धातास पाऊस : हवेत गारवा, अजूनही मोठ्या पावसाची गरज : पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना होणार सुरुवात

बेळगाव : गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या वळिवाने सोमवारी झोडपले. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. अर्धातासांहून अधिक वेळ पावसाने शहरासह उपनगरामध्ये हजेरी लावली. पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचा प्रचार करणाऱ्यांना याचा अधिक फटका बसला आहे. दरम्यान अजूनही मोठ्या पावसाची गरज असून त्यानतंरच शेती कामांना चालना मिळणार आहे. सोमवारी सकाळपासूनच उष्म्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्या अपेक्षानुसार पावसाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे हवेमध्ये काही काळ गारवा निर्माण झाला होता. सोमवारी बाजारहाटसाठी आलेल्या अनेकांना पावसामुळे आडोसा शोधावा लागला. य् ाा जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. शहरातील पॅम्प येथे ग्लोब चित्रपट गृहाच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर तलावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना साऱ्यांची दमछाक उडत होती. अलिकडचा हा पहिल्याचा पाऊस असल्यामुळे छत्री किंवा रेनकोट नसलेल्यामुळे अनेकांना भिजतच घर गाठावे लागली. गटारी व ड्रेनेजचे पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
भाजी विव्रेत्यांना फटका
शहरातील भाजीविव्रेते, फळविव्रेते यांना या पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावऊन पाणी वाहत असल्यामुळे भाजी आणि फळे कोठे ठेवायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला. उपनगरांनाही वळिवाने झोडपले.
प्रचार करणाऱ्यांची गैरसोय
सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक जण प्रचार कामात गुंतले होते. मात्र अचानक पाऊस आल्याने त्यांचीही गैरसोय झाली.
तापलेल्या जीवांना मिळाला सुखद गारवा
किणये : कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत होती. कधी एकदा वळिवाच पाऊस होणार याची आस साऱ्यांनाच लागून राहिली होती. उष्म्यामुळे सारेजण हैराण झाले होते. या तापलेल्या सर्व जीवांना सोमवारी वळीव पावसाच्या स्वरूपात सुखद गारवा मिळाला. य् ाा पावसामुळे साऱ्यांमध्ये आनंद दिसून आला. कारण बेळगाव शहरासह तालुक्यातील जनता कडक उन्हामुळे वैतागून गेली होती. झालेल्या वळीव पावसामुळे नागरिक सुखावले आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात होणार आहे.
जांबोटी-ओलमणी ऊस, मिरची पिकांना जीवदान
जांबोटी : जांबोटी-ओलमणी परिसरात सोमवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. हा पावसामुळे मिरची व ऊस पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले असून शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. सोमवारी सायंकाळी या परिसरात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा वळीव पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे तीव्र उन्हामुळे वाळून जाणाऱ्या शेतवडीतील मिरची, ऊस पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.









