इस्लामपूरमध्ये आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन
इस्लामपूर : भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने भाजप मंडलच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन केले होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते अॅड. चिमण डांगे, भाजपा शहर अध्यक्ष संदीपराज पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष सोमनाथ फल्ले, शहर भाजपा सरचिटणीस अल्ताफ तहसीलदार, समीर आगा, युवराज निकम, डॉ. उदय परदेशी, रवींद्र आवटे, अमोल ठाणेकर, संजय पाटील, वैभव हवलदार, सुमंत कुलकर्णी, महेश गायकवाड, रघुनाथ काळे, धनंजय माळी, अवुधत कुलकर्णी, नितीन फल्ले तसेच मल्लखांब खेळाडू उपस्थित होते.








