वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पॅनिश फुटबॉल लिग स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात माद्रिद फुटबॉल क्लबने व्हॅलेन्सियाचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला. माद्रिद आणि व्हॅलेन्सिया यांच्यातील सामन्यात व्हिनिसीयस व रॉड्रिगो यांची कामगिरी दमदार झाली. या दोन्ही फुटबॉलपटूंनी या सामन्यात प्रत्येकी 2 गोल नोंदविले. या विजयामुळे रियल माद्रिदने 2 गुण मिळविले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात गिरोना फुटबॉल क्लब आघाडीवर आहे. रियल माद्रिदपेक्षा त्यांनी 2 गुणांची आघाडी मिळविली आहे.









