वेंगुर्ले (वार्ताहर)-
राष्ट्रीय पातळीवरील लखनौ (यूपी) येथे पार पडलेल्या शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत वजराट येथील अथर्व रविंद्र परबने गोळाफेक क्रीडा प्रकारात १४.६२ मीटर गोळा फेकून रौप्य पदकाची कमाई केली. ते त्याचे राष्ट्रीय पदक आहे.चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्य स्तरावरील गोळा व थाळी फेक क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे त्याने नेतृत्व केले होते. सध्या तो ठाणे येथील श्री मावळी मंडळ हायस्कूल चरयी ठाणे येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. त्यासाठी त्याचे वडील रविंद्र परब ,आई रश्मी परब यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल वजराट सरपंच अनन्या पुराणिक,श्री गिरेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सेवा सोसायटी वजराट अध्यक्ष वसंत पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब ,गाव प्रमुख सुर्यकांत परब, गावातील अन्य मान्यवर व्यक्ती ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांचा तो भाचा आहे.









