आष्टा / सुनील पाटील :
आष्ट्याच्या वैष्णवी शिंदेच्या रूपाने सांगली जिल्हा महिला क्रिकेटला नवीन तारा गवसला आहे. ‘उब्ल्यूएमपीएल ‘मध्ये हा तारा चमकला. या ताऱ्याने महाराष्ट्रासह देशाने लक्ष वेधून घेतले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या देशातील पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये वैष्णवी शिंदेत्त्या अष्टपैलू कामगिरीमुळे पुणे वारियर्स संघाने विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी वैष्णवीच्या खेळाचे कौतुक करताना भारताकडून ती निश्चितपणे खेळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सांगली जिल्हा तसेच आष्ट्याच्या शिरपेचात क्रिकेटच्या माध्यमातून मानाचा तुरा खोवण्याचे आष्टा येथील वैष्णवी शिंदे केले. गहुंजे पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर नुकत्याच डब्ल्यू एमपीएल ही देशातील पहिलीच महिलांची राज्यपातळीवरची टी ट्वेंटी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण सहा संघानी सहभाग घेतला होता. आष्ट्याच्च्या वैष्णवी शिंदे यांची पुणे वॉरियर्स संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून निवड झाली होती. पुणे संघाने सरावाने सर्व सामने हरले. मात्र प्रत्यक्षात स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर एकाही सामन्यात पराभव पत्करला नाही. हे या संघाचे या स्पर्धेतील वेगळे वैशिष्ट्य ठरले. सर्वच सामन्यात यष्टीरक्षक तसेच फलंदाज म्हणून वैष्णवी शिंदे हिने महत्वाची आणि मोलानी भूमिका बजावली. वैष्णवी शिंदे हिच्या यष्टीरक्षणामुळे पुणे वॉरियर संघाला विजेतेपदावर नाव कोरता आले.
वैष्णवी ही माजी आ.स्व.विलासराव शिंदे यांची नात असून वाळवा पं.स.माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव यांच्या कन्या आहेत. वैष्णवी शिंदे हिने इयत्ता दहावीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षक अनिल जोब यांनी तिला प्रशिक्षण देऊन तिला यष्टीरक्षक होणेचा सल्ला दिला. १९ आणि २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघामध्ये सुद्धा तिची निवड झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचे सलग चार वर्ष कर्णधार पद तिने भूषविले. क्रिकेट मॅच खेळत असताना तिला दुखापत झाली. त्यामुळे जवळपास वर्षभर थांबावे लागले. तसेच कोरोनामुळे दोन वर्ष थांबावे लागले. तिचे बंधू वरदराज, भगिनी डॉक्टर विश्वजा तसेच तित्चे पती पृथ्वीराज माणकर यांचीही साथ तिला मिळाली. तिच्या जिद्द आणि चिकाटीमुळे प्रशिक्षक वेतन पडियार यांच्याकडे प्रशिक्षणास सुरुवात केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज यांचेही मार्गदर्शन तिला मिळते. सांगली जिल्हा महिला क्रिकेट संघाची ही कर्णधार म्हणून तिने कामगिरी बजावली.
वैष्णवीच्या रूपाने सांगली जिल्हा महिला क्रिकेटला भविष्यात निश्चितच चांगले दिवस येतील. तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक मुली क्रिकेटकडे वळतील यात शंका नाही.
- वैष्णवी आयपीएलसह भारताकडून खेळल : रोहित पवार
वैष्णवी शिंदे हिचा डब्ल्यूएमपीएलमधील खेळ पाहून प्रभावी झालेले आ रोहित पवार यांनी अंतिम सामन्यानंतर वैष्णवी शिंदेचे कौतुक केले. काही महिन्यानंतर होणाऱ्या आयपीएलसह आगामी काळात भारतीय संघाकडून वैष्णवी शिंदे खेळेल, असा विश्वास आ. रोहित पवार यानी यावेळी व्यक्त केला वैभव शिंदे आणि भाग्यश्री शिदे यांचेही आ. पवार यानी कौतुक केले.








