वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या आयटीएफ महिलांच्या विश्व टेनिस टूरवरील स्पर्धेत भारताची चौथी मानांकित वैदेही चौधरीने एकेरीत विजयी सलामी देत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात वैदेहीने अंजली राठीचा 6-3, 6-3, स्विसच्या जेनी ड्युरेस्टने भारताच्या यशस्वीनी पनवारचा 6-3, 6-2, इटलीच्या चेरुबिनीने सुखोटीनचा 6-1, 6-2, अलिकडेच नव्याने राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारी श्रीवल्ली रश्मिकाने बहामुसचा 6-1, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेच्या प्रारंभी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या ऋतुजा भोसलेचा कर्नाटक लॉन टेनिस संघटनेतर्फे गौरव करुन तिला 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या स्पर्धेत ऋतुजाचा प्रमुख ड्रॉमधील पहिला सामना बुधवारी होणार आहे.









