वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या महिन्याच्या अखेरीस दोहा येथे होणाऱ्या रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघात किशोरवयीन फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आयपीएल स्टार प्रियांश आर्य यांची मंगळवारी निवड करण्यात आली.
14 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारत ‘अ’ संघाला ओमान, यूएई आणि पाकिस्तान ‘अ’ संघांसह गट ‘ब’मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर गट ‘अ’मध्ये बांगलादेश ‘अ’, हाँगकाँग, अफगाणिस्तान ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ संघ आहेत. 14 नोव्हेंबर रोजी यूएईविऊद्ध मोहीम सुरू केल्यानंतर भारत ‘अ’ संघ 16 नोव्हेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ‘अ’ संघाशी खेळेल. सध्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघासह ऑस्ट्रेलियात असलेला जितेश आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व करेल. यात 14 वर्षीय सूर्यवंशीचाही समावेश आहे, ज्याने प्रचंड क्षमता दाखवली आहे.
जितेश आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा भाग होता. तिसऱ्या टी-20 मध्ये संजू सॅमसनच्या जागी खेळवण्यात आलेल्या या 32 वर्षीय खेळाडूने होबार्ट येथे ऑस्ट्रेलियाविऊद्ध नाबाद 22 धावा काढल्या आणि भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या वर्षाच्या सुऊवातीला आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सविऊद्ध राजस्थान रॉयल्सकडून 101 धावा काढून पुऊषांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वांत तऊण शतकवीर बनल्यानंतर सूर्यवंशी आता पुन्हा एकदा लक्ष ठेवण्याजोगा खेळाडू असेल. गेल्या महिन्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’विऊद्धच्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या युवा कसोटीतही त्याने शतक झळकावले होते.
वरच्या फळीतील युवा फलंदाज प्रियांशने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून चांगली कामगिरी केल्यानंतर आणि सप्टेंबरमध्ये कानपूरमध्ये झालेल्या भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील अनधिकृत एकदिवसीय सामन्यात शतक फटकावल्यानंतर संघात स्थान मिळवले आहे. याशिवाय संघात 26 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंगचाही समावेश आहे. त्याने रणजी सामन्यात तामिळनाडूतर्फे खेळताना हॅट्ट्रिक नोंदविलेली आहे.









