चौके/वार्ताहर
चौके गावची ग्राम देवता श्री.भराडी देवीला श्रीफळ ठेवून व आमदार वैभव नाईक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ देत,असे साकडे घालून चौके गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.आमदार वैभव नाईक यांना चौके गावातून मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.चौके गावातील अनेक विकासकामांना निधी देण्याचे काम आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.त्याची परतफेड चौकेवासिय करतील असे यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले.यावेळी गावामध्ये घरोघरी प्रचाराला सुरूवात करण्यात आला.
यावेळी चौके सरपंच गोपाळ चौकेकर,शाखाप्रमुख संजय गावडे,तालुका युवासेना प्रमुख मंदार गावडे,बिंजेद्र गावडे,विनोद साडंव,गणेश गावडे,गणेश चौकेकर,साहिल गावडे,गोठ्या सावंत,विष्णू चौकेकर,नारायण काटकर,संतोष बांदिवडेकर,सुरेंद्र गावडे,अजित पार्टे,श्री.पेंडुरकर व अन्य कार्यक्रते उपस्थित होते.
Previous Articleओला-सुका कचरा वर्गीकरण करून जमा करा
Next Article फुलबाग गल्ली, फोर्ट रोड येथील रस्त्यांची डागडुजी करा









