वैभव मराठे हे केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील महत्वाकांक्षी रेसर्ससाठी ट्रेलब्लेझर आणि प्रेरणास्थान म्हणून उभा आहे. मोटरस्पोर्ट्मध्ये एवढी उल्लेखनीय उंची गाठणारा एकमेव गोवेकर. वैभवचा प्रवास त्याच्या अथक समर्पणाचा, उत्कटतेचा आणि अतुलनीय प्रतिभेचा पुरावा आहे. देशात विविध प्रमुख शहरात होणाऱ्या राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशीपमध्ये प्रथम ‘मार्शल’चे काम करणारा वैभव मराठे मोटरस्पोर्ट् या साहसी खेळाकडे वळला. हळूहळू अनुभवाने वैभव या खेळात आला आाrण त्याने हे क्षेत्र आपल्या कठोर परिश्रमाने काबिज केले.
चॅम्पियनची उत्पती
वैभवच्या मोटरस्पोट् कारकीर्दीला 2005 मध्ये सुरूवात झाली जेव्हा ‘कॅन यू बीट दी फास्टस्ट इंडियन’ या स्पर्धेत भाग घेऊन त्याने 34.78 अशी सर्वांत वेगवान वेळ देत ऐतिहासिक टप्पा गाठला आणि भारताचा रेसिंग लिजंड, नारायण कार्तिकेयनचा विक्रम मोडला. सदर स्पर्धा टाटा रेसिंगने भारत पॅट्रोलियमच्या सहकार्याने नुवे येथील ‘गो कार्टिंग ट्रॅक’वर आयोजित केली होती. वैभवचा मोटरस्पोर्ट् खेळातील थरार त्यानंतर बहरत गेला. भारतीय राष्ट्रीय रॅली अजिंक्यपद स्पर्धांत आता वैभवच्या नावाचा दबदबा झाला होता. 2006 मध्ये, इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीप (आयएनआरसी) मधील प्रतिष्ठित ‘रॅली दी गोवा’ पूर्ण करणारा तो पहिला गोवेकर बनला. या दोन्ही सुरूवातीच्या कामगिरीने आपल्या प्रोफेशनल मोटरस्पोर्ट् कारकीर्दीची सुरूवात केली.
गोव्याचे मोटरस्पोर्ट् ‘पायनियर’
वैभवचा प्रवास केवळ त्याच्या कर्तृत्वासाठीच नाही तर गोव्याला राष्ट्रीय नकाशावर आणण्यात अग्रेसर असलेल्या भूमिकेसाठीही अनोखा आहे. अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात अडथळे तोडून आणि उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यात ते एकमेव आहेत.
चॅम्पियनची दृष्टी
वैभव मराठे यांची कथा ही अथक महत्वाकांक्षा आणि या धाडसी खेळात येणाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. पुढच्या पिढीसाठी एक आदर्श म्हणून तो महत्वाकांशी रेसर्ससाठी मार्ग मोकळा करत राहतो. जिद्द आणि कठोर परिश्रमाने कोणतेही स्वप्न मोठे नसते हे वैभव मराठेने वेळोवेळी सिद्ध केले आहे.
वैभव मराठेचा स्पर्धेतील सहभाग व उपलब्धी
- नुवे-गोवा येथे झालेल्या ‘कॅन यू बीट दी फास्टस्ट इंडियन’ या स्पर्धेत 34.78 अशी सर्वांत वेगवान वेळ देत भारताचा रेसिंग लिजंड, नारायण कार्तिकेयनचा विक्रम मोडला.
- मोटरस्पोर्ट् असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत रॅली दी गोवा -2006 गोवा लेग पूर्ण करणारा पहिला गोवेकर.
- रॅली आर्टद्वारे आयोजित फ्लॅश 2008 च्या पात्रता फेरीसाठी सर्वोत्तम वेळेसह 800 सीसी क्लासमध्ये पहिले स्थान.
- ऑटोक्रॉस बेंगलोरमध्ये 1300 सीसी, नवशिक्या आणि खुल्या वर्गात स्पर्धात्मक वेळेसह ‘दी हिल क्लाईंब रेस’ मध्ये दुसरे स्थान.
- ‘डी’ आर्ट 2009 ऑटोक्रॉसमध्ये 800 सीसी, 1300 सीसी, 1400 सीसी (एमपीएफआय), इंडियन ओपन व डिझेलमध्ये प्रथम स्थान.
- कोईंबतूर येथे झालेल्या म्हैसूर रॅली मध्ये सहभाग.
- टीम गोवाचे प्रतिनिधीत्व करताना ‘मारुती सुझूकी दक्षिण डेअर’मध्ये 1863 किलोमीरचे अंतर पूर्ण. कर्नाटकातील कुर्ग ऑटोक्रॉस स्पर्धेत सहभाग.
- 2011 मध्ये सालसेत यूथ असोसिएशनच्या ‘गोवा ऑटो क्रॉस चॅलेंज’ मध्ये सहभाग 800 सीसी वगळता अन्य सर्व विभागात प्रथम स्थान.
- म्हैसूरात झालेल्या एफएमएससीआयच्या इंडियन नॅशनल ऑटो क्रॉसमध्ये सहभाग.
- 2015 मध्ये बेंगलोरात झालेल्या ‘इनर लाईन रेसिंग ऑटो क्रॉस’मध्ये 1600 सीसी प्रकारात तिसरे स्थान.
- मंगळूरात झालेल्या आएमएससी मोटर स्पोर्ट्स मंगळूरने आयोजित केलेल्या स्पर्धेत 1600 सीसीमध्ये प्रथम, इंडियन ओपन क्लासमध्ये दुसरे तर 1400 सीसीमध्ये तिसरे स्थान.
- 2016 मध्ये केरळच्या कासारगोड येथे झालेल्या ‘लुसिया ऑटो क्रॉस’ अजिंक्यपद स्पर्धेत 1600 सीसी, इंडियन ओपन क्लास व 1400 सीसीमध्ये प्रथम स्थान.
- 2017 मध्ये मंगळूरात झालेल्या मुदबिद्री मंगळूर ऑटो क्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत 1400 सीसीमध्ये प्रथम तर 1600 सीसीमध्ये दुसरे स्थान.
- 2018 मध्ये कोईंबतूरात झालेल्या इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये फोर व्हील ड्राईव्ह क्लासमध्ये तिसरे स्थान.
- 2019 मध्ये बेंगलोरात झालेल्या ‘स्पिंट दी बेंगलोर’ स्पर्धेत आयएनआयसी विभाग चारमध्ये पहिले स्थान.
- चेन्नईत झालेल्या इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये आयएनआरसी चार विभागात प्रथम स्थान. कोईंबतूरात झालेल्या इंडियन नॅशनल रॅलीत सहभाग.
- बेंगलोरत झालेल्या इंडियन नॅशनल रॅली अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग व मिळविले दुसरे स्थान.
- गोव्यात झालेल्या राष्ट्रीय ऑटो क्रॉस स्पर्धेत एसयूव्ही क्लास, गोवन ओपनमध्ये प्रथम स्थान, 1600 सीसीमध्ये दुसरे स्थान आणि गोव्याचा वेगवान ड्रायव्हरचा किताब.
- 2019 मध्ये आयएनआरसी 4 मध्ये बनला राष्ट्रीय चॅम्पियन.
- 2019 मध्ये गोव्याचा उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्काराचा मानकरी.
- 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात झालेल्या इंडियन नॅशनल रॅलीत सहभाग आणि मिळविले तिसरे स्थान.
- 2020 मध्ये बेंगलोरात झालेल्या इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये सहभाग व पहिले स्थान.
- 2020 मध्यश कोईंबतूरात झालेल्या इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये सहभाग व प्रथम स्थान.
- 2020 मध्ये इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये राष्ट्रीय विजेताचा किताब.
संदीप मो. रेडकर









