पतिनिधी/पेडणे
जॉर्ज फिशर पायपिंग सिस्टिम्स, रत्नागिरी प्रायोजित डॉ. व्ही.टी. पाटील फाउंडेशन, कोल्हापूर संचलित मोप शाश्वत ग्रामविकास प्रकल्पांतर्गत मोपा येथे ’वाचू आनंदे ’ वाचनालय सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे प्रशिक्षक विनय गोसावी व लियाना साने यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी डॉ. व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त कांचनताई परुळेकर उपस्थित होत्या. त्यांनी वाचनाचे महत्त्व सर्वांना सांगितले.
या वाचनालयात उद्योग, व्यक्तिमत्व विकास, शेती व शेतीपूरक उद्योग, शैक्षणिक, चरित्र अशा पुस्तकांचा समावेश आहे. या वाचनालयाची जबाबदारी नारायण मोपकर यांनी स्वीकारली आहे. मंगळवार व शनिवार संध्याकाळी पाच ते सात ही पुस्तक देवाण-घेवाण करण्याची वेळ असणार आहे. गावातील पुस्तकपेमींनी याची नोंद घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.









