वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा एकदा जनावरांना लम्पी रोगाची लागण होऊ लागली आहे. गायी व बैलांना लम्पी रोगाची लागण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी बिजगर्णी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जनावरांना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गावातील गायीचे पूजन ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करून करण्यात आला. पशुवैद्यकीय खात्याचे अधिकारी डॉ. लक्ष्मण जमगी यांनी शेतकऱ्यांना लम्पी रोगाच्या लक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या भागातील जनावरांना लसीकरण करण्यात आले. यावेळी सतीश जाधव, पीडिओ हर्षवर्धन अगसर, उपाध्यक्षा पूजा सुतार व ग्रा. पं. सदस्य, शेतकरी उपस्थित होते.









