जागतिक आरोग्य संघटनेकडून 1 मे रोजी कोविड आणीबाणी दूर झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र या घोषणेचा भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांनी कोविड गेला अशी समजूत करुन घेतली. मात्र आजही कोविड रुग्णांची दैनंदिन नोंद होत आहे. ऋतूसंक्रमणाचा काळ नेहमी येतो. त्यात विषाणूजन्य आजार वाढतातही. सध्या विषाणूजन्य आजारात वाढ दिसून येते. कोविडला लागून आलेली बंधनं कोणालाच नकोयत. मात्र ते कुठपर्यंत जोपर्यंत लस नव्हती तोपर्यंत. लस आल्यावर टप्प्याटप्प्याने मुक्तता मिळालीच ना. अशावेळी ज्यामुळे निर्बंधमुक्त झालो अशी लसच जर नाकारली तर कसे होईल? ती लस घेतल्याने धोकाही नाही. त्यात झिकासारखे विषाणूजन्य रुग्ण आढळत आहेत. त्यामुळेच आता लसीकरणाचा प्रचार हेच सरकारी यंत्रणेसमोर खरे आव्हान आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात कोल्हापूर जिह्यात 1 सप्टेंबर रोजी झिका विषाणूच्या 3 रुग्णांची नोंद करण्यात आली. या तिघांचे नमुने एनआयव्ही पुणेकडे अहवाल पाठविण्यात आले आहेत. या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण न्युरोफिजिशियन म्हणजे डॉक्टर असून त्यांचे स्वत:चे क्लिनिक आहे. ते प्रासंगिक गावोगावी भेट देऊन रुग्णांवर उपचार करतात. असेच रुग्ण तपासणीसाठी रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये गेले असताना काही काळासाठी ते गणपतीपुळे येथील पार्किंग ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव झाल्याबाबत त्यांच्या इतिहास इतिवृत्तात आरोग्य यंत्रणेला सांगितले. त्यांना 25 ऑगस्ट रोजी ताप, थंडी आणि कणकण जाणवू लागली. तर 29 ऑगस्ट रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. दरम्यान इतर दोन पॉझिटीव्ह रुग्ण एका खासगी रुग्णालयात दाखल असून यातील एक महिला आणि एक पुरुष आहे. यावरुन आता या रुग्णांच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले.
या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील सुमारे दहा जणांचे नमुने तपासण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर ऑगस्ट महिन्यात मुंबईतील चेंबूर येथे एक झिका संसर्गित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कोविडप्रमाणे कामाला लागली होती. कोल्हापुरात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून झिका रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांचे 7 टिमकडून जलद ताप सर्वेक्षण करण्यात आले. यात ऊग्णांची माहिती घेणे, प्रवासाचा इतिहास, लक्षणे आणि त्यांच्या आजाराचे स्वऊप अशी माहिती गोळा करण्यात आली. त्यांच्या निकट व्यक्तिंचा शोध घेऊन त्यातील संशयित झिका व्हायरस सदृश्य लक्षणे असल्यास त्यांचे नमुने घेण्यात येत आहेत. यासह या तपासणीत ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले हा वर्ग अग्रणी तपासण्यात आला. हे सर्व इत्थंभूत लिहिण्याचे कारण म्हणजे डोळ्यासमोर कोविडच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेतील प्रसंग उभा राहिला. झिकासह फ्लू, डोळे येणे, अन्य विषाणूजन्य आजार ऋतू संक्रमण काळात वाढतानाच दिसून येत आहेत.
म्हणून सरकारी यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाय योजना युद्धजन्य स्थिती असल्याप्रमाणे कामाला लागली आहे. याला कारण म्हणजे झिकाचे रुग्ण वाढू न देणे, पॉझिटीव्ह असल्यास त्याला तिथेच थांबवणे हे सर्व सोपस्कार विषाणूजन्य आजारात सरकारी यंत्रणेकडून घेतले जात आहेत. कोविडसारख्या विषाणूजन्य आजाराची लस संशोधन झाले असल्यास ती घेणेच या प्रतिबंधात्मक उपायांपेक्षा अधिक सोयीस्कर ठरते. आता तर लस उपलब्ध असताना टाळणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कोविड लसीकरण अहवालानुसार, अद्याप 10 लाख 78 हजार 647 मुंबईकरांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तर 78 लाख 74 हजार 758 मुंबईकरांनी बुस्टर डोस घेतला नाही. 1 एप्रिलपर्यंत पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 21 लाख 99 हजार 370 एवढी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 8 लाख 94 हजार 110 इतकी आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 98 लाख 15 हजार 462 असून बुस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 14 लाख 89 हजार 797 इतकी आहे. सुऊवातीच्या काळात, महानगरपालिकेने संपूर्ण मुंबईत 300 हून अधिक लसीकरण केंद्रे सुरू केली होती. परंतु लसीकरणाकडे लोकांचा कमी होत असलेला प्रतिसाद पाहता या पेंद्रांची संख्याही कमी होत चालली आहे. सध्या मुंबई शहरात मुंबई महानगरपालिकेची कोविड19 ची 24 लसीकरण केंद्रे सुऊ असून 1 राज्य शासनाचे अशी एकूण 25 केंद्रे सुऊ आहेत.
म्हणजे फौजफाटा घटला असला तरी आजही लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम सुरु आहे. लसीकरणात शिथिलता विषयावर नवीन कोविड टास्क फोर्स अध्यक्ष तसेच राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट मत मांडले. नागरिकांनी कोविड विषय बंद करण्यामागे कारणे असली तरी मात्र ज्यांनी लस घेतली नाही, अशांना संसर्ग झाल्यास ते धोक्याच्या इशाऱ्यावर राहतील. शिवाय सध्या सुऊ असलेल्या ऋतू संक्रमणाच्या काळात विषाणूजन्य आजारांना जोर असतो. यात अप्पर रेस्पिरेटरी आजाराचे प्रमाण सर्वांनाच fिदसून येते आहे. मात्र याउपरही लसीकरण मोहिमेत शासकीय यंत्रणेतून किंवा नागरिकांमध्ये शिथिलता आली असल्यास सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले. तर कोविड लसीकरण जागऊकता अभियानातील अभ्यासक सुधीर गोरे यांनी सध्या कोविड लसीकरणात शिथिलता आली असल्यास सरकारने लसीकरण जागऊकतेवर प्रयत्न वाढवले पाहिजे.
ज्या भागात जागरुकता नाही अशा भागात प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत यातून पूर्ण समाजाला धोका राहू शकतो. हे सांगण्याचे काम सरकारचे आहे. जो वर्ग समजत नाही अशा वर्गाला पटवून सांगण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले. मात्र हे प्रयत्न पुन्हा वाढविण्याची गरज आहे. यातून 100 टक्के लसीकरणाच्या दिशेने जाता येईल. लसीकरणाप्रती असलेली टाळाटाळ दूर करण्यासाठी यंत्रणेने उतरणे आवश्यक आहे.
दरम्यान. यंदा जागतिक आरोग्य संघटनेने कोविडमधील आणीबाणी दूर करत घोषणा केली. मात्र कोविड अजूनही आपल्या सोबत असल्याचेही आरोग्य संघटनेने स्पष्ट केले. म्हणूनच कोविड रुग्णांची दैनंदिन नोंद अद्यापही होत आहे. मात्र कोविड आणीबाणी दूर या घोषणेचा लोकांनी वेगळा अर्थ काढून ते निश्चिंत झाले. त्यामुळे हीच वेळ आव्हानाची असून लसीकरणावर भर दिला पाहिजे. कोविड कोणालाही नकोय. तसेच कोविडला लागून आलेली बंधनंही नको आहेत. मात्र ते कुठपर्यंत जोपर्यंत लस नव्हती तो पर्यंत. लस आल्यावर टप्प्याटप्प्याने मुक्तता मिळालीच ना. अशावेळी ज्यामुळे निर्बंधमुक्त झालो अशी ती लसच जर नाकारली तर कसे होईल हे लोकांमध्ये प्रचार करणे सरकारी यंत्रणेचे काम आहे. तेही पटणाऱ्या आणि प्रभावी अशा माध्यमातूनच सांगणे गरजेचे आहे. आजही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे उघडी आहेतच. ती लस अजूनही दिली जात आहे. लसीकरण बंद केलेले नाही यामागील कारण गंभीरतेने सांगणे आवश्यक आहे. तेच खरे आव्हान आहे. कारण व्हेरियंटही बदलले आहेत.
राम खांदारे