आतापर्यंत 99.49 टक्के मोहीम पूर्ण : समस्या निवारणासाठी दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
जनावरांमध्ये आढळणारा वांझपणा, गर्भपाताची समस्या दूर करण्यासाठी पशुसंगोपन व पशुचिकित्सा विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ही मोहीम 99.49 टक्के पूर्ण झाली आहे.
वांझपणा, गर्भपातासंबंधिचा आजार गाय, मादी जातीचा घोडा, डुक्कर, श्वान, मेंढी, शेळीमध्ये दिसून येतो. गायींची गर्भधारणा झाल्यानंतर तिने 3-4 महिन्यांत वासराला जन्म दिल्यास किंवा गर्भपाताची पुनरावृत्ती झाल्यास जन्मलेले वासरू रोगाला बळी पडू शकते, असा अंदाज करण्यात आला आहे. वासरू प्रौwढावस्थेत येईपर्यंत कोणत्याही रोगाची लक्षणे त्यात ]िदसून येत नाही. मात्र, गर्भधारणेवेळी शरीरात बॅक्टेरियांचा शिरकाव होतो, असे पशुचिकित्सक सांगतात.
आजारावर केणताही उपाय नसल्याने संभ्रम
या आजारावर केणताही उपाय नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून लसीकरण करून आजाराला अटकाव करण्याचे प्रयत्न पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू आहेत. ब्रुसेला बॅक्टेरियामुळे उद्भवणारा वांझपणा व गर्भपात रोखण्यासाठी 4 ते 8 महिन्यांच्या वासरांचे लसीकरण करण्यात यावे. वासरू 18 महिन्यांचे झाल्यानंतर लसीकरण केल्यास काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात मादी जातीचे वासरू व रेडकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. 10 ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 4 ते 8 महिन्यांच्या 33,377 पैकी 33,208 वासरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुकावर यशस्वी झालेली लसीकरण मोहीम
बेळगाव-1523 पैकी 1514, अथणी-6200 पैकी 6173, बैलहोंगल-1370 पैकी 1370, चिकोडी-2667 पैकी 2667, गोकाक-4171 पैकी 4171, हुक्केरी-1722 पैकी 1720, कागवाड-1299 पैकी 1297, खानापूर-1170 पैकी 1170 निपाणी-1448 पैकी 1443, रायबाग-3496 पैकी 3387.
आजार माणसापर्यंत पोचण्याची शक्यता
प्राण्यांना होणार हा आजार माणसापर्यंत पोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या रोगाची लक्षणे दिसून आलेल्या गायीचे दूध कच्चे न पिता तापवून पिणे. दुग्धव्यवसाय, कत्तलखाने, लोकर उत्पादन या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अधिक दक्षता घ्यावी. अन्यथा संसर्ग होऊ शकतो. अंगदुखी, डोकेदुखी, वरचेवर ताप येणे यासारख्या तक्रारी सुरू होतात. महिलांमध्ये वांझपणाची समस्या उद्भवू शकते.









