फुलबाग गल्ली, चव्हाट गल्ली क्लस्टरतर्फे आयोजन
बेळगाव : सार्वजनिक शिक्षक खात्यातर्फे फुलबाग गल्ली, चव्हाट गल्ली क्लस्टर आयोजित खो-खो स्पर्धेत व्ही. एन. शिवणगी संघाने मराठी विद्यानिकेतन संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावित तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आपला शिक्कामोर्तब केला आहे. या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीत व्ही. एन. शिवणगी संघाने युजीएस क्र. 1 संघाचा एक डाव एक गड्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात या संघाने मराठी विद्यानिकेतनच्या खो-खो संघाचा 4 गड्याने पराभव करून विजेतेपद पटकाविले. या संघाला क्रीडा शिक्षिका कविता पाटील यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापिका मिनाक्षी वडेअर व सहशिक्षिकांचे प्रोत्साहन लाभले.









