प्रतिनिधी
बांदा
शैक्षणिक वर्ष २०२२-23 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत व्ही . एन . नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेच्या कु. रत्नाकर दत्तात्रय ओगले आणि आराध्य रामचंद्र तेली या दोन विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवून शाळेचे नाव अजून उंचावले आहे.
पाचवीच्या परीक्षेस पाच लाख 32 हजार 876 विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यातून पाचवीचे १६,५३७ विद्यार्थी पात्र ठरले. ग्रामीण सर्वसाधारण विभागात कु. आराध्य तेली याने ६२ वा आणि कु. रत्नाकर ओगले याने ८४ वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांचे हे यश शाळेसाठी कौतुकाची बाब आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श चेअरमन मंगेश रघुनाथ कामत , कमिटीचे सदस्य भाऊ वळंजू आणि शशी पित्रे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनिल राऊळ यांनी या यशाबद्दल विद्यार्थांचे कौतुक केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी त्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, सहशिक्षिका सौ. स्नेहा नाईक, हेलन राॅड्रीग्ज यांनी विशेष परिश्रम घेतले होते.









