प्रशांत खन्नुकर उपविजेता, उमेश गंगणे उकृष्ठ पोझर
बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व गोकाक तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 11 वी सतीश शुगर क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ए.टी. फिटनेसचा व्ही. बी. किरणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मिस्टर सतीश शुगर क्लासीक हा मानाचा किताब पटकविला. कार्पोरेशनच्या प्रशांत खन्नुकरला उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले. एसएसएस फौंडेशनच्या उमेश गंगणेने उकृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. चिकोडी येथील आरडी हायस्कूलच्या मैदानावरती आयोजित या स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 7 वजनी गटात झाली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
निकाल पुढील प्रमाणे…
- 55 किलो वजनी गटात : 1) गजानन गावडे-फिट प्रो, 2) उमेश गंगणे- एसएसएस फौंडेशन, 3) सागर कळ्ळीमनी-कार्पोरेशन, 4) रौनक गवस-पी.के.फिट, 5) संजयकुमार सनगुंडी-विजय फिट.
- 60 किलो वजनी गटात : 1) विशाल निलजकर-बी. स्ट्राँग, 2) उदय मुरकुंबी-जयभारत, 3) मंजुनाथ कलघटगी-फ्लॅक्स खानदुर, 4) फिरोज वडगावकर-मॉडर्न, 5) नितीश गोरल-पॉलिहैड्रॉन.
- 65 किलो वजनी गटात : 1) मंजुनाथ सोनटक्की-नेक्स्ट लेव्हल, 2) मंदार देसाई-आर. सी. फिटनेस, 3) अविनाश परीट-सिद्धीनाथ निपाणी, 4) अफताफ किल्लेदार-गोल्ड लाईफ, 5) मंजुनाथ धामणेकर-सर्व्हिसेस.
- 70 किलो वजनी गटात : 1) व्यंकटेशन ताशिलदार-पॉलिहैड्रॉन, 2) गणेश पाटील-संभाजी जीम, 3) सुनील भातकांडे-पॉलिहैड्रॉन, 4) मंजुनाथ कोल्हापुरे-लाईफ टाईम फिट, 5) ऋतिक पाटील-रुद्र.
- 75 किलो वजनी गटात : 1) प्रताप कालकुंद्रीकर-पॉलिहैड्रॉन, 2) राहुल कलाल-नेक्स्ट फिट, 3) विनीत हणमशेट्ट-रॉ फिट, 4) विजय पाटील-फिट प्रो, 5) मिलिंद कामटे-सिद्धिनाथ-निपाणी.
- 80 किलो वजनी गटात : 1) प्रशांत खन्नुकर-कार्पोरेशन, 2) गजानन काकतीकर-एसएसएस फौंडेशन, 3) आदित्य पाटील-बी. स्ट्राँग, 4) संदीप पावले-मॉडर्न, 5) राहुल हिरोजी-युनिर्व्हसल.
- 80 किलो वरील वजनी गटात : 1) व्ही. बी. किरण-ए.टी.फिट, 2) महेश गवळी-रुद्र, 3) मोहम्मद साकीब-डोंगारकी, 4) दिनेश मिनीजीस-फ्लॅक्स खानापूर, 5) विक्रांत सातवनेकर-ऑलिम्पिया यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर मिस्टर सतीश क्लासीक किताबासाठी गजानन गावडे, विशाल निलजकर, मंजुनाथ सोनटक्की, व्यंकटेश ताशिलदार, प्रताप कालकुंद्रीकर, प्रशांत खन्नुकर, व्ही. बी. किरण यांच्यात लढत झाली. यामध्ये व्ही.बी. किरण व प्रशांत खन्नुकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये ए.टी. फिटच्या व्ही. बी. किरणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासीक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा माताचा किताब पटकाविला. तर कार्पोरेशनच्या प्रशांत खन्नुकरने उपविजेतेपद पटकाविले. महावीर मोहीते, प्रभाकर कोरे,शिव पाटील, मांजरेकर, किरण रजपूत, रियाज चौगुले, अर्जुन नाईकवाडी, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, व्ही. बी. किरणला 1 लाख रुपये रोख, आकर्षक चषक, मानाचा किताब, प्रमाणपत्र व भेटवस्तु तर उपविजेत्या प्रशांत खन्नुकरला 55 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ पोझर उमेश गंगणेला 10 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, जय निलकंठ, जे. डी. भट्ट, गंगाधर एम., हेमंत हावळ, रमेश कळ्ळीमनी, काटेश बोकावी, सुनील पवार, सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, प्रितेश कावळे, सचिन मोहीते, नूर मुल्ला, आश्विन निंगन्नावर, शेखर जाणवेकर, आकाश हुलीयार, आसीफ कुशगल, शंकर पिल्ली, सलीम गावकर, कृष्ण चिक्कतुंबल यांनी काम पाहिले.









