अगसगे : सरस्वती हायस्कूल हंदिगनूरच्या शिक्षिका व्ही. बी. भोसले यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले.
द. म. शि. मंडळ संचालित हायस्कूल हंदिगनूर येथील कन्नड विषयाच्या शिक्षिका व्ही. बी. भोसले यांना शिक्षक दिनाच्यानिमित्त साई भवन, खासबाग येथे सार्वजनिक साक्षरता विभाग क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव ग्रामीण यांच्यावतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 30 वर्षे शिक्षकी सेवेत कार्य करत असताना विद्यार्थ्यांमध्ये एक शिस्तप्रिय विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सेवा केली. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.









