वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील नव्या पांडेने नवव्या आशियाई जिउ-जित्सू चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आणि ही कामगिरी करणरी ती पहिली महिला खेळाडू ठरली. जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या स्पर्धेत 45 किलो वजनी गटात पांडेने सुवर्णपदक जिंकले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तिला फोन करून तिचे अभिनंदन केले.









