अनेक लोकांना टॅटू काढण्याची खूप हौस असते. गोव्याला फिरायला गेलात की हमखास टॅटू काढला जातो. पण हीच हौस उत्तर प्रदेशातील १४ जणांना महागात पडली आहे. या १४ जणांना एकच सुई वापरल्यानं एड्सची बाधा झाली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. (Uttar Pradesh Varanasi News)
अधिक माहिती अशी की,
टॅटू काढल्यानंतर या १४ जणांना सुरुवातीला ताप यायला लागला. ताप कमी येईना म्हणून यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली आहे.यामध्ये त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झालं. या घटनेनं उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. या १४ जणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की,त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. तर, या 14 जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टनं पैसे वाचण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता.यामुळे या चौदा जणांना ए़ड्सची बाधा झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









