लखनौ :
उत्तरप्रदेशचे मंत्री आणि लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निवडणूक लढविणारे दिनेश प्रताप सिंह यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे. त्यांच्यावर लखनौमधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्ट्रोकमुळे त्यांच्या एका हाताला आणि पायाला ईजा झाली आहे. दिनेश प्रताप सिंह हे काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या रायबरेली दौऱ्यादरम्यान चर्चेत आले होते. दिनेश प्रताप सिंह यांनी स्वत:च्या समर्थकांसह राहुल गांधी यांचा वाहनताफा रोखला होता.









