वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रतिभावान आघाडीपटू उत्तम सिंग 5 ते 16 डिसेंबरदरम्यान क्वालालंपूर येथे होणाऱ्या ‘एफआयएच’ पुरूषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. सध्याचे आशियाई विजेते असलेल्या भारताला कॅनडा, दक्षिण कोरिया आणि स्पेनसोबत गट ‘क’मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत 5 डिसेंबरला कोरियाविऊद्धच्या सामन्याने स्पर्धेच्या मोहिमेला सुऊवात करेल.
त्यानंतरच्या पुढील सामन्यांमध्ये भारताचा सामना 7 डिसेंबर रोजी स्पेन आणि 9 डिसेंबर रोजी कॅनडाशी होईल. मागील स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर राहिला होता आणि प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी यावेळी संघ आपला प्रवास खूप पुढे नेण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे. आम्ही 2016 च्या कनिष्ठ विश्वचषक विजेत्या संघाकडून प्रेरणा घेतली आहे. भुवनेश्वरमध्ये झालेल्या गेल्या कनिष्ठ विश्वचषकातील संघाचा जे भाग राहिले होते ते काही अनुभवी खेळाडू यावेळी आमच्याकडे असून हे आमचे भाग्य आहे. ते नेतृत्व करून त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजयी होण्यास आमचे अंतिम प्राधान्य आहे, असे कुमार यांनी सांगितले.
गट ‘अ’मध्ये गतविजेते अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिली आणि मलेशिया, ‘ब’ गटात इजिप्त, फ्रान्स, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका, तर ‘ड’ गटामध्ये बेल्जियम, नेदरलँड्स, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
भारतीय संघ : गोलरक्षक-मोहित एच. एस., रणविजय सिंह यादव्हृ बचावपटू-शारदानंद तिवारी, अमनदीप लाक्रा, रोहित, सुनील जोजो, अमीर अली, मध्यफळीतील खेळाडू-विष्णुकांत सिंग, पूवन्ना सी. बी., रजिंदर सिंग, अमनदीप, आदित्य सिंग, आघाडीपटू-उत्तम सिंग (कर्णधार), आदित्य लालगे, अराईजित सिंग हुंडल (उपकर्णधार), सौरभ आनंद कुशावाह, सुदीप चिरमाको, बॉबी सिंग धामी, राखीव खेळाडू-सुखविंदर, सुनीत लाक्रा.









