मिरज / मानसिंगराव कुमठेकर :
लालित्यपूर्ण आणि बहारदार तबलावादनाने लाखो संगीत रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला मिरजेतील व्हटकर बंधूच्याकडे तयार होत असे.गेली 30 वर्षे उस्तादजींच्या तबल्याची देखभाल-दुरुस्तीही व्हटकर बंधूच करीत असत. त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडे उस्तादजींनी आपला तबला सोपवला नाही. उस्तादजींचे व्हटकर कुटुंबीयांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. ज्यावेळी ते कोल्हापूर-सांगली भागात येत त्यावेळी ते व्हटकर कुटुंबीयांची आवर्जून भेट घेत. उस्तादजींच्या निधनाने या कुटां†बयांचा मोठा आधारस्तंभ गमावला आहे. उस्तादजींचे मिरजेतील तंतुवाद्यनिर्मात्यांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते.
उस्तादजींमुळे व्हटकर बंधू मुंबईत
उस्ताद झाकीर हुसेन व त्यांच्या कुटुंबियांचे मिरजेतील हरिदास, विजय आणि संजय या तिघा व्हटकर बंधूंशी जिव्हाळ्याचे संबंध होते. व्हटकर बंधू हे अनेक वर्षे तबला, ढोलकी, मृदंग यांसह अन्य चर्मवाद्ये बनवित. ती अत्यंत दर्जेदार असल्याने देशभरात ती विक्रीसाठी जात. सन 1993 साली झाकीर हुसेन यांच्या सांगलीतील कार्यक्रमावेळी हरिदास व्हटकर यांनी उस्तादजींना एक तबला भेट दिला. त्या तबल्याचा दर्जा पाहून उस्तादजी प्रचंड खुश झाले. त्यांनी हरिदास व्हटकर यांना मुंबईस येण्याचे आमंत्रण दिले. उस्तादजींच्या सांगण्यावरूनच हरिदास व्हटकर यांनी माहीम येथे तबल्याचे छोटेखानी दुकान सुरू केले. तेव्हापासून गेली तीस वर्षे उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे बंधूची वाद्ये हरिदास व त्यांचे बंधू करीत आहेत.
उस्तादजींच्या तबल्याचे फॅमिली डॉक्टर
ज्या-ज्यावेळी उस्तादजींना नव्या तबल्याची आवश्यकता असते किंवा तो दुऊस्त करायचा असतो. त्यावेळी झाकीरभाई माहीम येथील व्हटकरांच्या दुकानात जाऊन स्वत:च्या देखरेखीखाली तबला दुऊस्त करून घेत. माहीमच्या त्या छोटेखानी दुकानात हरिदास व्हटकर यांच्याकडून तबला दुऊस्त करून घेताना उस्तादजींना अनेकांनी पाहिले आहे. एवढा मोठा जगप्रसिद्ध कलाकार आपल्या मोठेपणाची झूल बाजूला ठेवून दुकानात खाली बसत असे. आणि हरिदास यांच्याकडून तबल्याची दुऊस्ती करून घेत असे. सलग तीस वर्षे झाकीरभाई आपला तबला देखभाल-दुऊस्तीसाठी हरिदास व्हटकर यांच्याकडेच सोपवत. हा†रदास व्हटकर हे जणू त्यांच्या तबल्याचे ‘फॅमिली डॉक्टर’च होते.
व्हटकर कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते
उस्ताद झाकीर हुसेन हे ज्या-ज्यावेळी सांगली-कोल्हापूर भागात येत, त्यावेळी ते व्हटकर कुटूबियांची आवर्जून भेट घेत. 2012 साली उस्तादजी सांगलीत कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी वृंदावन व्हील येथे व्हटकर बंधूच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतला होता.
मिरजेतील तंतुवाद्य व्यवसायिकांही संबंध
मिरजेतील तंतूवाद्य व्यावसायिकांविषयीही उस्तादजींना ममत्व होते. देशभरातील विविध संगीत महोत्सवांच्या निमित्ताने तंतुवाद्य कारागीर जेथे जात तेथे त्यांची उस्तादजींबरोबर भेट होई. त्यावेळी झाकीरभाई या कारागिरांची व त्यांच्या व्यवसायाची आस्थेने चौकशी करीत. ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते अहमदसाहेब सतारमेकर, युवा कारागीर नईम सतारमेकर यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.








