अत्यंत दुर्गम ठिकाणी महिलेचे वास्तव्य
जगातील सर्वात दुर्गम गावांपैकी एका गावात राहणाऱ्या एका महिलेला दर दोन महिन्यांमध्ये अन्नधान्य विमानातून मागवावे लागते. 27 वर्षीय या महिलेचे नाव सलीना अल्सवर्थ आहे. तिचा जन्म अमेरिकेच्या अलास्काच्या पोर्ट अल्सवर्थ नावाच्या गावात झाला होता आणि तेव्हापासून ती तेथेच राहत आहे. 1940 च्या दशकात येथे तिचे आजीआजोबा राहण्यासाठी आले हेते. हा एक दुर्गम भाग आहे.
सध्या अलास्काच्या या गावात 180 लोक राहतात. येथे कुठलाही बार, थिएटर, दुकान किंवा रेस्टॉरंट नाही. 1940 च्या दशकात लोकांना अलास्कामध्ये राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सलीनाचे आजीआजोबा दोघांनाही येथे आत्मनिर्भरपणे राहू शकतो हे सिद्ध करावे लागले होते, यानंतरच सरकारने त्यांना उदरनिर्वाहासाठी जमीन दिली होती. येथील रहिवासी सामग्रीच्या पुरवठ्यासाठी नजीकचे शहर एंकोरेजवर निर्भर असून तेथे पोहोचणे हवामानाच्या स्थितीच्या आधारावर आव्हानात्मक असते.
बर्फ आणि धुके एक मोठा घटक आहे. येथे कुठलेच रुग्णालयत नाही, आमच्याकडे एक छोटे क्लीनिक असून ते मूलभूत उपचार पुरवू शकते, परंतु जर लहान मुलाची प्रकृती बिघडली किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास विमानातून एंकोरेज येथे जावे लागते. आमच्याकडे एकमात्र दुकान माझ्या परिवाराच्या रिसॉर्टमध्ये आमचे छोटेसे भेटवस्तूचे दुकान असल्याचे सलीनाने सांगितले.
गावात दोन कॉफी शॉप आहेत, परंतु ते एकाच ठिकाणी आहेत. येथे हिवाळा अत्यंत आव्हानात्मक असतो, कारण आम्ही अत्यंत दुर्गभ भागात राहतो आणि हिमवादळ आणि धुक्यामुळे येथे नेक दिवसांपर्यंत विमानं उतरू शकत नाहीत असे सलीनाने सांगितले आहे.
वर्षभर प्रतिकूल हवामान
येथे विशिष्ट हवामानातच काही विशेष प्रकारची विमाने उ•ाणं करू शकतात. गावात दर दाने महिन्यांनी अन्नधान्याचा पुरवठा होतो, त्यापूर्वी काही आणायचे असेल तर एंकोरेज शहरापर्यंत विमानाने प्रवास करावा लागतो. आम्हाला दर दोन महिन्यामंध्ये एकदा अन्नधान्याचा पुरवठा मिळतो, मी ऑक्टोबरमध्ये हिवाळ्यासाठी स्वत:च्या गरजेच्या सर्व गोष्टी खरेदी करण्याचा प्रयत्न करते, जेव्हा हवामान अनुकूल होते तेव्हा आमच्या फ्रीजरला सॅल्मन माशांनी भरून टाकतो असे सलीनाने सांगितले आहे.
पतीसोबत आनंदात वास्तव्य
सलीना येथील लेक क्लार्क रिसॉर्टमध्ये मॅनेजर आहे. सलीनाचा पती 25 वर्षीय जेरेड रिचर्डसन हा मासेमारीत पारंगत आहे, तो गावात आलेल्या अनेक पर्यटकांपैकी एक आहे, दोघांची भेट जेरेड त्या रिसॉर्टवर काम करत असताना झाली होती.
पतीसाठी येथे राहणे आव्हानात्मक
जेरेड गावातील वास्तव्यात उत्तमप्रकारे सरावला आहे. प्रारंभी माझ्या पतीसाठी हे एक आव्हान होते, परंतु आम्ही या स्थितीला चांगल्याप्रकारे सामोरे गेलो. लोकसंख्येपासून इतके दूर राहणे जेरेडसाठी पूर्णपणे नवे नव्हते. तो स्वत:च्या ट्रकमधून यापूर्वीही दुर्गम भागात फिरायचा. येथे देखील आम्ही ट्रकवर सामग्री भरून फिरत असतो असे सलीनाने सांगितले.









