उन्हाळ्यात डिहाइड्रेशन, थकवा आणि आळस जाणवतो. भूक न लागणे आणि डिहायड्रेशनमुळे अनेक लोक आजारांना बळी पडतात.यावेळी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात आहारात विविध हंगामी भाज्या आणि फळे म्हणजे काकडी, टरबूज,कलिंगड आणि लिची इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये भरपूर पाणी आहे. फळांपासून तयार केलेले ज्यूस ही तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यास मदत करतील.आज आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोणती पेये प्यायला हवीत.
सर्वांच्या घरी ताक बनवले जाते. त्यात काळे मीठ आणि पुदिन्याची पाने घातली की त्याची चव आणखी वाढते. त्यात तुम्ही ताजी कोथिंबीरही टाकू शकता. जिरे आणि हिंग त्याची चव दुप्पट. खरोखर ताक हे अतिशय आरोग्यदायी आणि चवदार पेय आहे. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
सत्तू भाजलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून बनवला जातो. हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे पाणी, लिंबू, काळे मीठ आणि पुदिना वापरून बनवले जाते. हे ज्यूस मुलांना पुरेशी ऊर्जा देण्याचे काम करते.
उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तुम्ही रोज एक ग्लास नारळ पाणी मुलांना देऊ शकता. यामुळे मुले दिवसभर हायड्रेटेड राहतील.
एक ग्लास लिंबू पाणी कडक उन्हात आराम देण्याचे काम करते. लिंबाचा रस, जिरेपूड, काळे मीठ आणि पुदिन्याची ताजी पाने वापरून लिंबू पाणी बनवले जाते. लिंबू पाणी चवदार आणि आरोग्यदायी आहे. मुलांच्या आहारात तुम्ही लिंबूपाणीचा समावेश करू शकता. लिंबू पाणी हे एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे पेय खूप फायदेशीर आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









